भटक्‍या कुत्र्यांसाठी धावले प्राणीमित्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली ः कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यासह प्राणी,पक्ष्यांची गेल्या काही दिवसांपासून उपासमार सुरू आहे. त्यांना अन्न पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी डॉग युनिट व प्राणीमित्र धावले आहे. 

जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना संसर्गाने महाराष्ट्रातही पाय पसरले आहे. सांगली जिल्ह्यात दोन दिवसांत नऊ कोरोना बाधितांची संख्या झाल्याने यंत्रणा जागी झाली. प्रशासन खबरादारी घेत असून गेल्या काही दिवसांपासून शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी लागू करण्यात अली असल्याने रस्ते ओस पडले आहे. यातच रस्त्यावरील भटक्‍या कुत्र्यांसह प्राण्यांचे अन्न पाण्याविना उपासमार सुरू आहे. तसेच रस्त्यावरून कुत्र्यांचे कळपच्या कळप फिरू लागले आहे. वाहनचालकांवर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे.

यासाठी महापालिकेचे डॉग युनिट आणि प्राणी मित्र अजित काशीद यांच्या पुढाकारातून भटक्‍या कुत्र्यांसह मांजरांना अन्न पुरवण्याची व्यवस्था केली जात आहे. 

सारे सदस्य मिळून रोज एका परिसरातील किमान 150 ते 200 कुत्री व मांजरे याना अन्न देण्याची व्यवस्था करत आहेत. नागरिकांनाही आपआपल्या परिसरातील भटक्‍या जनावरांना अन्न व पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन प्राणी मित्रांनी केले आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animal friends ran for stray dogs