esakal | दीड लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात; पशु विभागाच्या काम बंद आंदोलनाचा परीणाम
sakal

बोलून बातमी शोधा

animal

दीड लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By
हिरालाल तांबोळी

घाटनांद्रे (सांगली) : गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या पशुधन पर्यवेक्षकाच्या असहकार आंदोलनामुळे कवठे मंहाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील सुमारे नऊ हजार दोनशे पासष्ट व तालुक्यातील सुमारे १ लाख ४७ हजार सहाशे सत्त्याहत्तर जनावरांचे लसी करणासह अन्य उपचार थांबले आहेत. १५ जुलैपासून काम बंद आंदोलनाचा इशारा पशुधन पर्यवेक्षक संघटनेच्यावतीने देण्यात आलेला आहे.(animal-health-ishu-department-of-animals-sangli-news)

याबाबत अधिक माहिती अशी

कवठेमहांकाळ तालुक्यासह चोहीकडे पशुधन पर्यवेक्षक व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी १५ जून पासून अहवाल बंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान गेले महिनाभरापासून या प्रश्नाबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने ता १५ जुलैपासून काम बंद आंदोलन पशुधन पर्यवेक्षक संघटनेच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. सन २००९ सालची अधिसूचना रद्द करावी, पशुधन पर्यवेक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन अधिकारी संवर्गातील तिसऱ्या कालबद्ध पदोन्नती वेतन निश्चिती मध्ये सुधारणा करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य अकरा मागण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक संघटनेच्यावतीने आंदोलनाचा बडगा उगारण्यात आलेला आहे.

या पशुधन पर्यवेक्षकांच्या आंदोलनामुळे कवठेमंहाकाळ तालुका व घाटमाथ्यावरील गाय, म्हैस व जनावरांचे लसीकरण व अन्य उपचार थांबले आहेत. तालुक्याच्या घाटमाथ्यासह कवठेमंहाकाळ तालुक्यामध्ये पशुपालन हा व्यवसाय असून शेतकऱ्यांचे अर्थकारण याच व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. पशुधन पर्यवेक्षक व अन्य पदाधिकाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून शासनाने याबाबत करू का करावा कवठे मंहाकाळ तालुक्यात घाटमाथ्यावरील सर्व जनावरांचे लसीकरण व अन्य उपचार तातडीने सुरू करावेत, अशी मागणी घाटमाथ्यावरील पशुपालन शेतकरी वर्ग करीत आहे.

गाव निहाय जनावरांची संख्या.....

कुची : (३१८५)

जाखापूर : (११६५)

कुंडलापुर : (५८८)

तिसंगी : (१६०३)

वाघोली : (५८६)

गर्जेवाडी : (३६४)

घाटनांद्रे : (१७७१)

एकूण : ९ हजार २६२

आमच्या प्रलंबित मागण्याबाबत शासनाकडून सकारात्मक विचार व्हावा,पशुपालन विभागातील लोकांना न्याय द्यावा ही अपेक्षा.

- वजीर चौगुले, अध्यक्ष, जिल्हा पशु चिकिसा व्यवसाय संघटना

पशु विभागाच्या काम बंद आंदोलनामुळे गेली पंधरा दिवसांपासून जनावरांचे लसीकरण झाले नाही. आंदोलनाबात लवकर तोडगा निघावा.

- विनायक जाधव, शेतकरी झुरेवाडी

loading image