Nikita Kankanwadi Appointed Scientist-B at Central Silk Board
esakal
अंकली (जि. बेळगाव) : येथील विद्यार्थिनी निकीता कंकणवाडी यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. वरिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. त्यांच्या या यशाची दखल घेत भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधीन कार्यरत असलेल्या केंद्रीय रेशीम मंडळात त्यांची ‘शास्त्रज्ञ-ब’ (सायंटिस्ट-बी) या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती झाली (Nikita Kankanwadi Central Silk Board selection) आहे.