अंकलखोप 15 ऑगस्टपासून बनणार इ-ग्रामपंचायत 

वैभव यादव 
Friday, 14 August 2020

अंकलखोप ( ता. पलूस ) ग्रामपंचायत पलूस तालुक्‍यातील पहिली व जिल्ह्यातील तिसरी इ - ग्रामपंचायत बनणार आहे.

अंकलखोप : अंकलखोप ( ता. पलूस ) ग्रामपंचायत पलूस तालुक्‍यातील पहिली व जिल्ह्यातील तिसरी इ - ग्रामपंचायत बनणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीने सकाळ व ऍग्रोवन 'ऍग्रोटेक इंडस्ट्रीज'शी करार केला आहे. 15 ऑगस्ट रोजी ऍपचा शुभारंभ होणार आहे. 

गावचे स्वतंत्र ऍप तयार केले जात आहे. ऍपद्वारे गावच्या घडामोडी, विकासकामे , जगभरातील ताज्या घडामोडी याची माहिती, शेतकऱ्यांना शेतीविषयक सखोल माहिती, बाजार भाव यांची माहिती घरबसल्या एक क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. सरपंच अनिल विभुते यांनी करारपत्र ' ऍग्रोवन ऍग्रोटेक इ.प्रा. ' चे प्रतिनिधी प्रीतम बुधावले यांच्याकडे सुपूर्द केले आहे. 

ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई- ग्राम चांगले माध्यम आहे. ऍपद्वारे सरपंच , उपसरपंच, सदस्य , ग्रामसेवक यांचे छायाचित्र, माहिती समाविष्ट होणार आहे. ग्रामपंचायत कर या ई -ग्राम द्वारे भरता येतील. दंवडी देता येईल. गावाची पायाभूत माहिती , वैशिष्ट्य, विकास आराखडा मांडता येईल.

यावेळी उपसरपंच सौ. सुनीता चौगुले, ग्रामपंचायत सदस्य .महेश वारे, सौ.संगीता कोळी, .मच्छिंद्रनाथ गडदे, उज्वला लांडगे, सुधीर खंडागळे, भानुदास सूर्यवंशी, विनय पाटील, सौ.शबाना शिकलगार, सौ.मिनाक्षी सूर्यवंशी .संदिप गुरव, सौ.स्वाती पाटील, सौ. सुलभा पाटील, अशोक चौगुले, सुनिल चौगुले, सौ. किशोरी सुतार, सौ. वनिता कुराडे, बातमीदार वैभव यादव, ग्रामविकास अधिकारी संग्राम सुतार, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. 

बदलत्या काळानुसार नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे लोकांपर्यंत जावीत. शासनाच्या योजना तात्काळ नागरिक शेतकरी बांधवाना समजतील, "यासाठी ई-ग्राम हे ऍप उपयुक्त ठरेल. 
- अनिल विभुते, सरपंच, ग्रामपंचायत अंकलखोप 

स्पर्धेच्या काळात प्रशासन ही बदलत चालले आहे. ई - ग्राम ऍप द्वारे शासकीय निर्णय लवकर समजतील. लोकांच्या तक्रारीचे निराकरण होईल. नोकरी व्यवसाय निमित्त गावाबाहेर असणाऱ्या लोकांना गावची इंत्थभूत माहिती मिळेल. ते गावाशी सतत जोडले जातील . " 
- संग्राम सुतार, ग्रामविकास अधिकारी, अंकलखोप 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankalkhop will be an e-gram panchayat from August 15