इस्लामपूर (सांगली) : जागतिक किर्तीचे साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe Statue) यांचा जन्म वाळवा तालुक्यात झाला असला, तरी आजपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याची उभारणी झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाने (Matang Community Demand) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे.