माझं बरं-वाईट झालं तर लोक मोदींना जबाबदार धरतील: अण्णा

Anna Hazare
Anna Hazare
Updated on

राळेगण सिद्धी : 'लोकपाल आणि कृषीप्रश्नांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या ३४ पत्रांपैकी आणखी एका पत्राला प्रतिसाद मिळाला असून त्यातही केवळ 'आपले पत्र मिळाले' एवढाच उल्लेख आहे. शिवाय उपोषणाच्या चौथ्या दिवसापर्यंत मागण्यांसंदर्भात केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणीही संपर्क केला नसून माझं काही बरं-वाईट झालं तर लोक नरेंद्र मोदींना जबाबदार धरतील', असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी अण्णांचे वजन साडे तीन किलोपर्यंत घटले आहे. तर रक्तदाब कमी-अधिक होत असल्याने डॉक्टरांची चिंता वाढलेली आहे. मात्र अण्णा मागण्यां संदर्भात भूमिकेवर ठाम असून शरीरात प्राण असेपर्यंत उपोषण करणारच, असे  अण्णांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

अण्णा पुढे म्हणाले, 'सरकारला माझ्या वयाची आणि तब्बेतीची काळजी असते, तर चार दिवस वाट पाहिली नसती. माझ्या जीवाची जबाबदारी पंतप्रधानांची आहे, सरकार त्यांच्या वाटेने तर आम्ही आमच्या वाटेने जात आहे. माझ्या मागण्यांसंदर्भात मार्ग निघणारच, पण त्याला वेळ लागेल'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com