ब्रेकिंग ः निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी, अण्णा १० वाजता सोडणार मौन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी द्या, या मागणीसाठी मौन सुरू केले होते. २० डिसेंबर २०१९मध्ये त्यांनी हा पवित्रा घेतला होता. आत तब्बल तीन महिन्यांनी त्या गुन्हेगारांना फाशी देण्यात आली. त्यानंतर अण्णांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

 "पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" असे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे त्यांचे मौन आंदोलन आज तीन महिन्यानंतर सोडणार आहे, अशी माहिती अण्णांचे स्वीय सहाय्यक संजय पठाडे यांनी सकाळशी बोलताना दिली.

आज सकाळीच पहाटे साडेपाच वाजता निर्भया अत्याचार प्रकरणातील चारही आरोपींना तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. अण्णांनी जोपर्यंत निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मौन सोडणार असा निर्धार व्यक्त केला होता.
हजारे सकाळी 10 वाजता यादवबाबा मंदिरातील यादवबाबांचे दर्शन घेतील. त्यानंतर त्यांचे गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेले मौन सोडणार आहेत.
त्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमाबरोबर संवाद साधणार आहेत.
आजही अण्णांचे सकाळ नेहमीप्रमाणे झाली. पहाटे सकाळी लवकर उठून त्यांनी योगासने, प्राणायाम, चालणे असे व्यायाम केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna will leave the silent movement