सातारा : शनिवार घातवार; 40 रुग्ण वाढले; निर्बंधांचा कचाटा वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

आज सापडलेल्या रूग्णांमध्ये तालुक्यातील म्हासोली,  पाटणसह खंडाळा तालुक्यातील पारगाव- खंडाळा, पिंपोडे, वाई तालुक्यातील वासोली, सातारा मधील शाहूपुरी, जकातवाडी, खावली येथील रुग्णांचा समावेश आहे.बहुतांश रुग्ण मुंबई, जळगाव आदी ठिकाणाहून प्रवास करून आलेले समजते.

कऱ्हाड :  जिल्ह्यात शुक्रवारी एकही कोरोना बाधित सापडला नसल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र शनिवारी सकाळी आलेल्या अहवालात तब्बल ४० जण. पॉझिटिव्ह  आल्याने जिल्ह्याला आणखी मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्ह्यातील  बाधित रुग्णांची संख्या २४१ वर पोचली  आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा पुन्हा निर्बंधाच्या कचाट्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी एक ही बधीत न सापडल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र शनिवारी सकाळी जिल्ह्याला मोठा धक्का बसला. ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. यात पाटण,  कऱ्हाड, सातारा आदी तालुक्यातील बाधित यांचा समावेश आहे त्यामुळे प्रशासनही गतिमान झाले आहे. 

यातील बहुतांश बाधित मुंबई तसेच बाहेरून प्रवास करून आल्याचे दिसून येते. यात पाटण तालुक्यातील 15,  कऱ्हाड तालुक्यातील सहा बधितांचा  समावेश आहे. पाटण तालुक्यातील डेरवन  येथील दहा महिन्याच्या बालक कोरोना मुक्त झाल्यानंतर पाटण तालुका कोरोना मुक्त बनला होता. मात्र, बनपुरी, धामणी आदी सह आज नव्याने १५ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

या सापडलेल्या रूग्णांमध्ये तालुक्यातील म्हासोली,  पाटणसह खंडाळा तालुक्यातील पारगाव- खंडाळा, पिंपोडे, वाई तालुक्यातील वासोली, सातारा मधील शाहूपुरी, जकातवाडी, खावली येथील रुग्णांचा समावेश आहे.बहुतांश रुग्ण मुंबई, जळगाव आदी ठिकाणाहून प्रवास करून आलेले समजते.

 आज सकाळी 4० रुग्ण आढळल्याचे समजताच जिल्ह्याला धक्का बसला. या रुग्णांमुळे बाधितांचे संख्या २४१ झाली आहे. आज आलेल्या अहवालात   लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे. तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

आज पॉझिटिव्ह आढळलेले तालुकानिहाय रुग्ण असे :

पाटण 18 - पाटण शहर 15, गमेवाडी 2, भलेकर वाडी एक
खंडाळा तालुका चार - पारगाव दोन, येणे वाडी एक, घाटदरे एक
कराड तालुका तीन - मासोली एक उंब्रज 1 बाचोली एक
फलटण तालुका चार - कोळकी 4
मान तालुका तीन - शीबजाव दोन, लोधवडे एक
कोरेगाव तालुका 2 - पिंपोडे एक,  कोरेगाव एक
सातारा तालुका 5 - जकातवाडी एक, शाहूपुरी 2, गडकर आळी 2
वाई तालुका एक - वासोली एक

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 40 Corona Infected Patients Found In Satara District Today