या जिल्ह्यासाठी मिळणार आणखी 48 हजार टन मोफत धान्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

सांगली, ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर केंद्र सरकरने गरीबांना येत्या पाच महिन्यांसाठी मोफत पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि एक किलो हरभरा डाळ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. जिल्ह्यातील चार लाख शिधापत्रिका धारकांना 48 हजार 470 टन धान्य मोफत मिळणार आहे. 

सांगली, ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर केंद्र सरकरने गरीबांना येत्या पाच महिन्यांसाठी मोफत पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि एक किलो हरभरा डाळ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. जिल्ह्यातील चार लाख शिधापत्रिका धारकांना 48 हजार 470 टन धान्य मोफत मिळणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत धान्याबरोबरच प्रत्येक रेशन कार्डवर एक किलो डाळही मोफत दिली मिळणार आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात अनलॉक दुसरा टप्पा सुरु आहे. लोकांचा रोजगार थांबला आहे. त्यामुळे सरकारने रेशन कार्डधारकांना धान्य देण्याचा दुसऱ्यांदा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दोन प्रकारच्या कार्डधारकांना धान्य वितरण करण्यात येते. यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय धान्य योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित धान्य वितरण करण्यात येते. जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 227 कार्डधारक या योजनेमध्ये आहेत. त्यांना 9 हजार 300 टन धान्य आणि 3.94 टन डाळीचे वाटप होणार आहे. 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रत्येक कुटुंबातील प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात आले आहे. केवळ प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजना अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी वितरण करण्यात आले आणि यापुढेही तेच धोरण कायम ठेवण्यात येणार आहे. 
.......... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 48,000 tonnes of free foodgrains will be available for the district