आटपाडीत आणखी एकास कोरोनाची लागण; तालुक्‍यात आठ रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

आटपाडी (सांगली) - सोनारसिद्ध नगर तेथील दोन कोरोणाग्रस्त बहिणीच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आज आला. तसेच दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी सापडलेल्या चार कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तालुक्‍यातून विविध भागातून प्राथमिक लक्षणे आढळल्याने तपासणीसाठी पाठवलेल्या पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आटपाडी तालुक्‍यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ झाली आहे. 

दोन दिवसापूर्वी आटपाडी तालुक्‍यात एकाच दिवशी चार रुग्ण आढळून आले होते. यामध्ये सोनारसिद्ध नगर येथील दोन बहिणी, पिंपरी खुर्द येथील एक आणि आटपाडी एक जण आढळला होता. त्यांच्या संपर्कात नऊजण आले होते. त्यांना तपासणीसाठी मिरजेला पाठवले होते. यातील आठ अहवाल आज आले. यात सोनारसिद्ध नगर येथील सापडलेल्या कोरोनाग्रस्त मुलींच्या वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ते थेट या मुलींच्या संपर्कात आले होते. तर तेथीलच एक संपर्कात आलेला अहवाल प्रलंबित आहे. इतर आठ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच खरसुंडी, करगणी, आणि आटपाडीत बाहेरून आलेल्या आणि प्राथमिक लक्षणे आढळलेल्या इतर पाच जणांना तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचे अहवालही प्रतीक्षेत आहेत. आज आढळलेल्या नवीन कोरोना ग्रस्तांच्या संपर्कात कोण कोण आले होते याची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाने चालू केले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another corona infection in Atpadi; Eight patients in the taluka