धारावीतून आणखी सह जण रेठरे धरणमध्ये 

1Corona_Danger_19.jpg
1Corona_Danger_19.jpg


इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्‍यातील रेठरे धरण येथे आणखी सहा जण मुंबईच्या धारावी येथून आले आहेत. आरोग्य विभागाने या सर्वांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले आहे. इस्लामपूर येथे अवैधरित्या आलेल्या धारावीमधील लोकांच्या घटनेनंतर हे आणखी काही लोक आल्याने भीती व्यक्त होत आहे. दरम्यान इस्लामपुरात माकडवाले गल्लीत कंटेन्मेंट करण्यात आले असून इतर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. 

तीन दिवसांपूर्वी धारावी येथील चार जण आधी इस्लामपूर येथील माकडवाले गल्लीत आले आणि त्यांच्यानंतर आणखी 16 जण वाळवा तालुक्‍यातील कासेगाव येथे दाखल झाले. या सर्वांना सांगलीला पाठवण्यात आले असून इस्लामपुरात जे चौघे काही काळ थांबले होते, त्यापैकी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे तर आणखी बारा वर्षे वयाच्या एका मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. 

मुख्याधिकारी प्रज्ञा पवार आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला, परंतु त्यातील एक महिला व मुलगी पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारावीतील या लोकांचे हे प्रकरण ताजे असतानाच रेठरे धरण येथे काल (ता. 23) आणखी 6 जण दाखल झाले आहेत; परंतु आरोग्य विभागाने तत्काळ सतर्कता दाखवत त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान इस्लामपूर येथील माकडवाले गल्ली परिसरात खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कंटेन्मेंट करण्यात आले आहे आणि नगरपालिकेच्या वतीने औषधफवारणी करून घेण्यात आली आहे. 


धारावीमधून आलेले नंतरचे सहाजण परवानगी घेऊन आले आहेत, त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, तरीही त्यांची तपासणी केली जाईल. 
नागेश पाटील, प्रांताधिकारी. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com