अमली पदार्थ विरोधी दिन यंदा जनजागृतीविनाच; कोरोना इफेक्ट

Anti-drug day this year without public awareness; Corona effect
Anti-drug day this year without public awareness; Corona effect
Updated on

बिळाशी (जि. सांगली)  : भारतातील विशेषतः बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात सापडल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने "व्यसनमुक्ती धोरण' जाहीर करण्यात आले आहे. भावी तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी शासनाने अमली पदार्थांवर बंदी घातली आहे. दरवर्षी 26 जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन असतो. मात्र यावेळी कोरोनाच्या सावटामुळे हा दिवस जनजागृतीविनाच पाळला गेला. 

दरवेळी या दिवशी शालेय स्तरावर प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये विशेषतः जनजागृती केली जाते. यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागातून विशेषतः उपक्रम राबवले जातात. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांनी त्या-त्या विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरावरील शाळांमध्ये, स्वयंसेवी संस्थांमध्ये पत्रक काढून 26 जून रोजी जनजागृतीपर फेरी, अंमली पदार्थांवर बंदी; तसेच यावर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पथनाट्यांचे आयोजन आदी उपक्रमाबांबत कार्यवाही केली जात असते. सध्या राज्यात ओढवलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे शैक्षणिक तसेच सेवाभावी संस्थांना सुट्टी आहे. त्यामुळे यावर्षीचा "जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन' जनजागृतीविनाच झाला आहे. 

हे आहेत मादक पदार्थ 

ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना 'मादक' अथवा 'अमली' पदार्थ म्हणतात. अफूपासून मोर्फीन, हेरॉंईन आदी नशिले पदार्थ तयार केले जातात. कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) आदींचाही मादक पदार्थांमध्ये समावेश होतो. 

मादक पदार्थांच्या विळख्यात युवापिढी

सध्या मादक पदार्थांच्या घट्ट विळख्यात युवापिढी जात आहे. युवकांनो जीवन आनंदीच असते, ते अधिकच सुंदर करण्यासाठी अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा. यासाठी योग, व्यायाम, ध्यान, साधना करा. 

- वसंत खवरे, शिक्षक, अमली पदार्थ विरोधी जनजागृती समर्थक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com