मोठी बातमी! ऍन्टीजेन टेस्टमध्ये सापडले 'एवढे' छुपे रुग्ण

2Corona_20Sakal_20times_4 - Copy.jpg
2Corona_20Sakal_20times_4 - Copy.jpg

सोलापूर : शहरातील छुप्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने ऍन्टीजेन टेस्ट करण्यावर भर दिला. शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्रातून ही टेस्ट केली जात आहे. 17 ते 24 जुलैपर्यंत शहरातील आठ हजार 327 व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 374 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. रामवाडी, दाराशा, मजरेवाडी व जोडभावी या चार नागरी आरोग्य केंद्रांवर सर्वाधिक 160 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. 

 
शहरातील एक लाख व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्टे महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार दररोज किमान दीड ते दोन हजार टेस्ट होणे अपेक्षित आहे. दरम्यान, 17 जुलैपासून महापालिकेने सरासरी साडेआठशे व्यक्‍तींची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केली आहे. 17 जुलैला 287 पैकी चार व्यक्‍तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर 18 जुलैला 642 टेस्टमध्ये 28 पॉझिटिव्ह, 19 जुलैला 818 पैकी 34 पॉझिटिव्ह, 20 जुलैला 703 पैकी 38 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तसेच 21 जुलैला 921 टेस्टमध्ये 51 रुग्ण आढळले. 22, 23 आणि 24 जुलैपर्यंत दोन हजार 936 व्यक्‍तींची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 156 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर शनिवारी (ता. 25) तब्बल दोन हजार 20 टेस्ट झाल्या असून त्यामध्ये 69 रुग्ण सापडले आहेत. लक्षणे नसतानाही कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा रुग्णांपासून इतरांना धोका होऊ नये म्हणून रॅपिड ऍन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जात आहे. 

 
शहरातील ऍन्टीजेन टेस्ट (18 ते 24 जुलैपर्यंतची स्थिती) 

  • नागरी आरोग्य केंद्र   एकूण टेस्ट  पॉझिटिव्ह 
  • साबळे आरोग्य केंद्र   425            11 
  • बाळे                       403             26 
  • भावनाऋषी             406             12 
  • सोरेगाव                  432             23 
  • दाराशा                   1,072          44 
  • मजरेवाडी               382             30 
  • मुद्रा सनसिटी          267              5 
  • रामवाडी                 407             49 
  • जोडभावी                415             35 
  • जिजामाता               256             24 
  • देगाव                     383              21 
  • नई जिंदगी              196              5 
  • विडी घरकूल          532               3 
  • शेळगी                   217              13 
  • सिव्हिल                 267              00 
  • एकूण                    6060            301 

दररोज एक हजारांहून अधिक व्यक्‍तींची टेस्ट 
कडक संचारबंदी लागू झाल्यानंतर सुरवातीच्या काही दिवसांत टेस्टचे प्रमाण सातशे ते आठशे होते. मात्र, आता नगरसेवकांच्या पुढाकारातून दररोज एक हजारांहून अधिक व्यक्‍तींची टेस्ट केली जात आहे. तपासणीसाठी स्वत:हून पुढे न येणाऱ्यांची आरोग्य केंद्रनिहाय टेस्ट करुन संबंधित रुग्णांचे निदान केले जात आहे. त्यातून आगामी काळातील धोका आटोक्‍यात येऊन कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत होण्यास मदत होणार आहे. कुटुंबप्रमुखांनी स्वत:च्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ही टेस्ट करुन घ्यावी. 
- मंजिरी कुलकर्णी, आरोग्याधिकारी, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com