एपीएमसी व्यापाऱ्यांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

खासगी भाजी मार्केट बंद करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
APMC Merchant Movement Demand for closure of private vegetable market
APMC Merchant Movement Demand for closure of private vegetable market

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी खासगी भाजी मार्केट बंद करण्यासाठीचा लढा तीव्र केला आहे. सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. त्यांनंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे निवेदन देण्यात आले. आम्हाला न्याय द्या, अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. असेही यावेळी जिल्हाप्रशासनाला सांगण्यात आले.

बेळगाव शहरात एपीएमसीत एक सरकारी भाजी मार्केट असताना देखील गांधीनगर येथे खासगी भाजी मार्केट उभारण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे सरकारचा शेस देखील कमी झाला आहे. तसेच व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. ते मार्केट बंद करावे यासाठी ३ फेब्रुवारीपासून एपीएमसी आवारात आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला पावनेदोन महिने उलटले आहेत. तरी देखील सरकारने यावर कोणताच उपाय काढलेला नाही. यासाठी अर्धनग्न अवस्थे आंदोलन करण्याचा पवित्रा या व्यापाऱ्यांनी घेतला.

सरकारने त्या भाजी मार्केटला कोणत्या आधारावर परवानगी दिली आहे, असा सवाल सरकारला विचारण्यात आला. तसेच लाखो रुपये खर्च करून आम्ही दोन वर्षांपूर्वी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गाळे घेतले आहेत. निविदेनुसार हे गाळे घेतले असल्याने आम्ही शेस देखील भरतो. त्या भाजी मार्केटमुळे या ठिकाणी व्यवसाय करणे अवघड बनले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी कर्ज घेऊन गाळे घेतले होते. मात्र, त्यांना कर्जाचे हफ्ते भरणे देखील अवघड बनले आहे. यामुळे ते भाजी मार्केट तातडीने रद्द करावे अशी मागणी करण्यात आली.

सरकार तसेच प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आमच्याकडे विष प्राशन करून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याला सरकार जबाबदार असेल, असेही व्यापाऱ्यांनी जिल्हाप्रशासनाला सांगितले. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १२.३० पर्यंत हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, या भाजी मार्केटच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची नेमणुक केली आहे. तुम्हाला योग्य तो न्याय दिला जाईल. असे आश्‍वासन दिले. यावेळी सतीश पाटील, बसनगौडा पाटील, सदानंद पाटील, संजय सन्नी, नितीन पाटील, संतोष व्हनारसे, रोहित कुंडेकर, राजु बेळगावकर, प्रविण कांबळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com