सरकारचा विरोध असतानाही सीमाभागातील 865 गावांना मिळणार महाराष्ट्राच्या 'या' योजनेचा लाभ; कसं ते जाणून घ्या..

महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या गावातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
Mahatma Phule Arogya Yojana
Mahatma Phule Arogya Yojanaesakal
Summary

या योजनांसाठी अर्ज कसा करावा याबाबतची माहिती देण्यासाठी शहराच्या विविध भागात समितीच्या वतीने सेवा केंद्रे सुरू करण्यात आली होती.

बेळगाव : ‘आरोग्य योजने’ला (Arogya Yojana) प्रशासनाचा विरोध असला तरी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्यामुळे मराठी भाषिकांकडून महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) योजनांसाठी अर्ज केले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने विरोध करीत केंद्र बंद करण्याची सूचना केली असली तरी त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील ८६५ गावातील नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेळगावसह (Belgaum) कारवार, बिदर व गुलबर्गा जिल्ह्यातील महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या गावातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

Mahatma Phule Arogya Yojana
कर्नाटकातील स्वस्त डिझेलची महाराष्ट्रात विक्री; दररोज 30 हजार लिटरचा पुरवठा, सीमाभागातील अनेक पंपांना फटका

या योजनांसाठी अर्ज कसा करावा याबाबतची माहिती देण्यासाठी शहराच्या विविध भागात समितीच्या वतीने सेवा केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र, कन्नड संघटनांनी विरोध केल्यामुळे समितीतर्फे सुरू करण्यात आलेली केंद्रे आठ दिवसांसाठी बंद करण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर काही केंद्रे बंद केली असली तरी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत.

Mahatma Phule Arogya Yojana
Talathi Exam : अंध तरुणांची तलाठी परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी; अंध गुरूच्याच मार्गदर्शनाने मिळाली नवी दिशा

मराठी भाषिकांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. यासाठी समिती व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मात्र, कर्नाटक प्रशासनाची भूमिका अत्यंत चुकीची आहे याचा विचार करून कार्यकर्त्यांना ऑनलाईन नोंदणी करा आणि योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

-प्रशांत भातकांडे, समिती कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com