आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीला तीन पेट्रोल पंप उभारण्याची मंजुरी

नागेश गायकवाड
बुधवार, 4 जुलै 2018

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पेट्रोल पंप उभारणीसाठी गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. त्यांनी वेगवेगळ्या पेट्रोलियम कंपन्यांशी संपर्क साधून पंपाची मागणी केली होती. अखेर एकाच वेळी तीन पंप त्यांना मंजूर झालेत. राज्यात बाजार समितीना एकाच वेळी तीन पंप मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे देशमुख आणि गायकवाड यांनी सांगितले.

आटपाडी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला खरसुंडी, करगणी आणि दिघंची येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे तीन पेट्रोल पंप उभारण्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि कृषी पणन मंडळाचे संचालक तथा बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पेट्रोल पंप उभारणीसाठी गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. त्यांनी वेगवेगळ्या पेट्रोलियम कंपन्यांशी संपर्क साधून पंपाची मागणी केली होती. अखेर एकाच वेळी तीन पंप त्यांना मंजूर झालेत. राज्यात बाजार समितीना एकाच वेळी तीन पंप मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे देशमुख आणि गायकवाड यांनी सांगितले.

ते म्हणाले की,'तिन्ही पंपाचे काम दिवाळीपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल. या तिन्ही ठिकाणी पंपाची अत्यंत गरज होती. यासाठी कंपनीने जाहिरात केली नव्हती तर आम्हीच कंपनीकडे मागणी केली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन जागेची पाहणी केली. बाजार समितीचा आढावा घेतला. बाजार समितीच्या कामामुळेच तीन पंपाला मंजूरी मिळाली. यावेळी बाजार समितीचे संचालक ऋषीकेश देशमुख,बी.टी.पाटील,अजयकुमार भिंगे,सचिव शशिकांत जाधव उपस्थित होते.

Web Title: Approval of three petrol pumps for Atpadi Agricultural Market Committee