esakal | वास्तुविशारद सुमीत बगाडे यांना व्ही.डी.जोशी पुरस्कार जाहीर 
sakal

बोलून बातमी शोधा

वास्तुविशारद सुमीत बगाडे यांना व्ही.डी.जोशी पुरस्कार जाहीर 

या पुरस्काराचे वितरण उद्या (बुधवार) पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी दीड वाजता होईल.

वास्तुविशारद सुमीत बगाडे यांना व्ही.डी.जोशी पुरस्कार जाहीर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः भारतीय फेरोसिमेंट सोसायटीतर्फे विख्यात अभियंता (कै.) व्ही. डी. जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्मृती पुरस्कार यंदा येथील वास्तुविशारद सुमीत बगाडे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या (बुधवार) पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी दीड वाजता होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली. 
फेरोसिमेंट दिनानिमित्त प्रतिवर्षी फेरोसिमेंट सोसायटी अभियंता व वास्तुविशारदांसाठी स्पर्धेचे आयोजन करते. त्यातून सर्वोत्कृष्ट अशा बांधकामाची निवड केली जाते. या पुरस्काराचे यंदा सातवे वर्ष आहे. यापूर्वी पदुच्चेरीच्या ऑरोव्हिलाच्या वास्तुविशारद अनुपमा कुण्डू, पुण्यातील वास्तुविशारद अजय ठोसर, केरळमधील अभियंता बीजी जॉन, औरंगाबादचे श्रीशिल्प कन्सल्टंटस, अमेरिकेतील ओवेन वाल्शे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. वास्तुविशारद वैशाली मोहिते, सुहास महामुनी, पुष्यमित्र दिवेकर व चंद्रशेखर हंगेकर या निवड समितीने सुमीत बगाडेंची पुरस्कारासाठी निवड केली आहे. 

बगाडे यांनी साताऱ्यातील राज-वास्तू या संकुलात युनिटी आणि कम्युनिटी असा संदेश देणारे फेरोसिमेंट पद्धतीचे एक मंदिर उभारले. कॉंक्रीटच्या वापरापेक्षा यात 30 टक्के बचत होते हे त्यांनी त्यातून सिद्ध केले. येथे फेरोसिमेंट पद्धतीची घरे भूकंप प्रतिरोधक असतात. तसेच त्यांची बांधणी देखील सोपी असते. लाकडाच्या फळ्या, खडी, विटा- दगड यांची गरज इमारत बांधकामासाठी लागत नाही. त्यामुळे ही घरे पर्यावरणपूरक असतात.

loading image
go to top