यंदा मास्कसहित मावळ्यांचे आगमन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

तर यंदा ऑनलाईन अध्यापनास दिवाळी सणाची दोन आठवड्यांची सुट्टी आहे. या सुट्टीत बोल गोपाळ किल्ले बांधणीसाठी लागणारे दगड, विटा, मातींची जुळवा जुवळ करून भव्य दिव्य किल्ले ऊभारू लागले आहेत. तर यंदा कोरोना संसर्गामुळे मास्क परिधान केलेले मावळे खरेदी करून ते किल्ल्यांवर ऊभे केले जाणार आहेत. तर अनेक मावळ्यांच्या हाती कोरोना नियमावलीचे फलक देऊन प्रबोधन सुरू आहे. 

मिरज  (सांगली) ः प्रतापगड...पन्हाळा...रायगड...अशा एक ना अनेक किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारण्याची लगबग बाल गोपाळांकडून दिवाळीच्या अनुषंगाने सुरू आहे. दिवाळी हा सण बाळ गोपाळांना किल्ले बांधणी, कपडे खरेदी, मामाच्या गावाला जायचा सण मानला जातो. यंदा कोरोना संसर्गामुळे मार्चपासून शाळांना सुट्टीच असलेल्याने ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया सुरू आहे.

तर यंदा ऑनलाईन अध्यापनास दिवाळी सणाची दोन आठवड्यांची सुट्टी आहे. या सुट्टीत बोल गोपाळ किल्ले बांधणीसाठी लागणारे दगड, विटा, मातींची जुळवा जुवळ करून भव्य दिव्य किल्ले ऊभारू लागले आहेत. तर यंदा कोरोना संसर्गामुळे मास्क परिधान केलेले मावळे खरेदी करून ते किल्ल्यांवर ऊभे केले जाणार आहेत. तर अनेक मावळ्यांच्या हाती कोरोना नियमावलीचे फलक देऊन प्रबोधन सुरू आहे. 

यंदा किल्ले तयार करताना किल्ल्यांवर आकर्षक देखावे यासह दवाखाने, ग्ण्‌ुवाहिका, डॉक्‍टर, नर्स आदिंचे स्टीकर्स या साहित्यांची बाजार पेठेत रेलचेल आहे. तर पोलिसदादांचे मावळे देखिल आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहेत. यंदा दिवाळीला गोड धोड पदार्थ आणि कपडेच बाल गोपाळांना मिळणार आहे. तर मामाचे गाव कोरोना संसर्गामुळे गाठता येणार नाही. यामुळे ही दिवाळी घरच्या घरीच साजरी होणार आहे. तसेच यंदा फटाके मुक्त दिवाळी साजरी होण्याची शक्‍यता आहे. कारण कोरोना बाधितांना फटाक्‍यांच्या धुराचा संसर्ग होण्याची दाट शक्‍यता काही पर्यावरण संस्थांकडून व्यक्त केल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrival of Mavals with masks this year