वाखरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा सोहळा पंढरीनाथाच्या दर्शनासाठी आतुर झालेला असताना आजच्या वाटचालीत ऊन आणि पाऊस झेलत दुसरे उभे रिंगण पार पडले. त्यानंतर हा सोहळा शुक्रवारी संध्याकाळी वाखरीत विसावला..पीराची कुरोलीत सकाळी सहा वाजता पादुकांना अभिषेक करण्यात झाला. काकड आरती झाली. पालखी समोर सकाळी सात वाजता नंदकुमार देहूकर दिंडीच्यावतीने कीर्तन झाले. दरम्यान, रथ दोन मोर, फुलांनी तयार केलेले विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक मूर्ती, संत तुकाराम महाराजांचे छायाचित्र आणि ‘तुका झालासे कळस’ असे नामोल्लेख केलेला रथ फुलांनी सजवला होता. .त्यानंतर, दिंड्यामध्ये जेवण सुरू झाले. यंदाच्या ३४० व्या सोहळ्यातील शेवटच्या मुक्कामासाठी सोहळा वाखरीकडे दुपारी बारा वाजता मार्गस्थ झाला. त्यानंतर, काही अंतरावर देहू संस्थानच्या माजी अध्यक्ष ताराबाई इनामदार यांच्या समाधी समोर आरती करण्यात आली. दुपारी पावणे बारा वाजता सोहळा पुणे-पंढरपूर या मुख्य रस्त्यावर आला.पीराची कुरोली गावातील ग्रामस्थ मुख्य रस्त्यापर्यंत निरोप देण्यासाठी सहभागी झाले होते. वाडी कुरोली येथे पहिला विसावा घेतला. त्यानंतर, सोहळा वाटचाल करीत भंडीशेगावला सव्वा तीन वाजता दुपारच्या विसावा पोचला. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. उड्डाणपूल झाल्याने वाहने पुलावरून जात होती. वाहनांची गर्दी सोहळ्याला जाणवत नव्हती. पावसाची सर बरसत असताना सोहळा उभ्या रिंगणासाठी मार्गस्थ झाला..दरम्यान, माऊलींचा सोहळा उड्डाण पुलाच्या कडेने बाजीराव विहीर या ठिकाणी रिंगणासाठी गेला होता. त्या रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे माऊलींच्या सोहळ्यातील काही दिंड्या उड्डाणपुलावरून पुढे मार्गस्थ झाल्या. त्यांच्यापाठोपाठ संत तुकाराम महाराजांचा सोहळ्यातील चौघडा पावणेपाच वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलाची मध्यावर पोचला. तर पाच वाजता रथ उड्डाणपुलावरून शंभर मीटरवर उतरला. रथामागील दिंड्या उड्डाणपुलावर उभ्या रिंगणासाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी पाऊस थांबला होता. त्यानंतर, काका चोपदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभे रिंगण लावले. संस्थानचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, दोन्ही अश्व रथाच्या दिशेने धावले, रथामागील २०-२५ दिंड्यांपर्यत पोचले. रथातील पादुकांचे दर्शन घेऊन नगारखान्या जवळ अश्व पोचले. त्यावेळी, ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष सुरू होता.रिंगणानंतर हरिपाठाचे अभंग सुरू होते. संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सोहळा मुक्कामी विसावला. यावेळी ठाकूरबुवा दैठणकर दिंडीच्या वतीने कीर्तन तर पुणे येथील नवी पेठ मंडळ यांच्या वतीने रात्री जागर झाला..आज पंढरपूरकडे प्रस्थानजगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात उद्या, शनिवारी (ता. ५) सकाळी सात ते नऊदरम्यान बोधे सातारकर यांच्या वतीने कीर्तन होईल. त्यानंतर सोहळा दुपारी एक वाजता वाखरी येथून पंढरपूरकडे निघणार आहे.दोन्ही पालख्यांचे मंत्र्यांकडून दर्शनजलसंपदामंत्री गिरीश महाजन, माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी वाखरी येथे, तर रिंगणाच्या वेळी मत्स्य व्यवसायमंत्री नीतेश राणे, खासदार प्रणिती शिंदे यांनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे महाजन यांनी दर्शन घेतले. यानंतर सोहळा प्रमुख उमेश मोरे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर सुनील महाराज देहूकर आणि त्यांची फुगडी रंगली. ‘‘ यंदा पाऊस वेळेवर झाल्याने दीड ते दोन पट गर्दी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी, शेतमजूर यंदा वारीमध्ये सहभागी झाले आहेत. वारीच्या नियोजनासाठी मी चार दिवसांपासून पंढरपुरात आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, राहण्याची व्यवस्था उत्तम आहे,’’ असे महाजन यांनी सांगितले.वाखरी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळील उड्डाणपुलावर शुक्रवारी पार पडले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.