esakal | इस्लामपूरच्या पार्श्वभूमीवर हे शहर अलर्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

 Ashta city on Alert due to corona found in Islampur

इस्लामपूर येथील कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर आष्टा नगरपालिका अलर्ट आहे. शहरात दोन वेळा निर्जंतुकीकरण फवारणी पूर्ण झाली आहे.

इस्लामपूरच्या पार्श्वभूमीवर हे शहर अलर्ट 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आष्टा : इस्लामपूर येथील कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर आष्टा नगरपालिका अलर्ट आहे. शहरात दोन वेळा निर्जंतुकीकरण फवारणी पूर्ण झाली आहे. परदेशातून आलेल्या आठ जणांचा होमक्वारंटाईन, गुजरात, राजस्थानसह पुणे मुंबईवरून आलेल्या नोकरदारांच्या घरी भेटी सुरू आहेत.

वाळवा तालुक्‍यात लोकसंख्येच्या दृष्टीने इस्लामपूरनंतर आष्टा शहर मोठे आहे. इस्लामपूरच्या एकाच कुटुंबातील व त्यांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुका हादरला आहे. त्यातच इस्लामपूर येथे याच कुटुंबातील पार्टी, अन्‌ आष्टा शहरातील नेते, नातेवाईकांची पार्टीला उपस्थिती याची चर्चा रंगली. त्यातील काहीजण निगराणीखाली आहेत. 

तालुक्‍यातील बधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी हेमंत निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे यांनी नागरिकांना होम क्वारंटाईनचे आवाहन केले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आष्टा नगरपालिका प्रशासन दक्ष आहे. प्राथमिक टप्प्यात शहरभर धूर फवारणी केली. 
शहरात प्रभाग निहाय जंतुनाशक फवारणीचे काम सुरू आहे. ते दुसऱ्यांदा पूर्ण झाले. पालिकेच्या माध्यमातून जागृती सुरू आहे. भित्तीपत्रिका वाटप सुरू आहे. अत्यावश्‍यक सेवांसाठी विशिष्ट वेळ दिली आहे. गर्दी होऊ नये यासाठी चौकाचौकातून भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे. 

किराणा दुकानदारांची नुकतीच बैठक झाली. नागरिकांच्या मागणीनुसार घरोघरी किराणा माल पोचवण्याची यंत्रणा उभी केली. पालिकेच्या वतीने टीम नेमण्यात आली आहे. या टीमद्‌वारे गुजरात, राजस्थान, कर्नाटकसह मुंबई, पुणे या मोठ्या शहरातून आलेल्यांची माहिती संकलित केली जात आहे. घर भेटी देऊन या नागरिकांवर वॉच ठेवला जात आहे. 
परदेशातून आलेल्या आठ जणांचे होम कोरंटाईन सुरू होते. त्यांचा कालावधी पूर्ण झाला. पालिका प्रशासनाकडून 15 दिवसांपासून सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांमुळे अद्याप कोणालाही कोरोनाची बाधा झाली नाही. पालिकेला यश आले आहे. आष्टेकर नागरिक कोरोनाबाबत सजग आणि दक्ष आहेत. प्रशासनाने आरोग्याच्या सर्व सुविधा पुरवण्याबरोबर जागृतीचे काम सुरू केले आहे. 

नागरिकांनी भीती बाळगू नये

कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन दक्ष आहे. निर्जंतुकीकरणासाठी शहरात दोन वेळा फवारणी पूर्ण झाली. शहरात एकही रुग्ण नाही. नागरिकांनी भीती बाळगू नये. काळजी घ्यावी. प्रशासन सोबत आहे.

- स्नेहा माळी, नगराध्यक्ष, आष्टा पालिका