
आष्टा : येथे इमारत बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची साधने न पुरवल्यामुळे इमारतीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. कृष्णाकुमार शिवप्रसाद जोशी (वय ४०, मूळ रा. गंगापूर ता. नवागड जि. बेमेतरा छत्तीसगड; सध्या रा. आष्टा ता. वाळवा) असे मृत कामगाराचे नाव आहे. याबाबत बांधकाम ठेकेदार संतराम जगजीवन वंजारे (संतनामीपारा सोनपुरी ता. जि. बेमेतरा, छत्तीसगड) याच्यावर आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद मृताची पत्नी ललिताबाई कृष्णाकुमार जोशी यांनी दिली आहे.