Sangli News : आष्टा मंडळाला दुष्काळी मंडळातून वगळले, शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त

दुष्काळी मंडळ जाहीर करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी
ashta Mandal excluded from drought MLA Babasaheb Patil demand to declare drought in ashta
ashta Mandal excluded from drought MLA Babasaheb Patil demand to declare drought in ashtaSakal

चाकूर : आष्टा (ता.चाकूर) महसुल मंडळाचा दुष्काळी महसुल मंडळात समावेश नसल्यामुळे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अऩिल पाटील यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात असल्याची कैफीयत मांडल्यानंतर याबाबत योग्य निर्णय घेण्याचे मंत्री महोदयांनी आमदारांना आश्वासीत केले आहे.

दुष्काळी महसुल मंडळाची घोषणा शासनाकडून करण्यात आली असून यात तालूक्यातील चार मंडळाचा समावेश आहे. आष्टा मंडळात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळी परस्थिती असतानाही दुष्काळी मंडळात याचा समावेश करण्यात आला नाही. यामंडळात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिण्यामध्ये ७५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झालेला असून सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे.

याभागात सलग २१ दिवसा पेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. यामंडळाची पिकांची सुधारीत आनेवारी ४८ टक्के पेक्षा पेक्षा कमी आलेली आहे. पिकांचे उत्पन्न कमी आल्यामुळे २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पिकविमा कंपनीला दिला आहे. तरीही या मंडळाला दुष्काळी मंडळातून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे या मंडळाचा दुष्काळी मंडळात समाविष्ठ करावा, शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसानी बाबत आपत्ती निवारण निधीमधुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदन पाठवून केली व दुरध्वनीवरून संपर्क साधला असता याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासीत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com