esakal | आष्टा नगरपालिका वार्तापत्र : विरोधकांची धार बोथट; सत्ताधाऱ्यांना बळ

बोलून बातमी शोधा

Ashta Nagarpalika Newsletter: Opposition's blunt edge; Power to those in power

मतदारांच्या असंतोषावर स्वार होत इर्षेने आष्टा पालिकेत प्रवेश केलेल्या विरोधकांनी पहिल्याच टप्प्यात सत्ताधाऱ्यांना घाम फोडला.

आष्टा नगरपालिका वार्तापत्र : विरोधकांची धार बोथट; सत्ताधाऱ्यांना बळ
sakal_logo
By
तानाजी टकले

आष्टा (जि. सांगली) : मतदारांच्या असंतोषावर स्वार होत इर्षेने पालिकेत प्रवेश केलेल्या विरोधकांनी पहिल्याच टप्प्यात सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. आरोपांनी सत्ताधारी घायाळ झाले. सत्ताधाऱ्यांनी काही अपक्षांना सोबत घेत सत्तेचा वारू हाकला. मधल्या टप्प्यात ठेकेदारी टक्केवारीने विरोधक बरबटले. विरोधकांची बोथट होणारी धार नागरिकांची विरोधासाठीची चिंता वाढवणारी ठरत आहे. आगामी पालिका निवडणुकीत जनतेला तिसराच पर्याय शोधावा लागणार असे दिसते.

पालिकेत शिंदे घराण्याचा वरचष्मा राहिला आहे तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ. माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या घराण्याने सत्तेच्या चाव्या हाती ठेवल्या आहेत. सन 1978 नंतर 81, 86 च्या निवडणुका राजारामबापू व विलासराव शिंदे (काकासाहेब शिंदे v/s बापुसाहेब शिंदे) या दोन गटात झाल्या. सन 1996 ची निवडणूक मंत्री जयंत पाटील व माजी आमदार विलासराव शिंदे गटात झाली. पाटील गटाला सत्ता मिळाली.

तेंव्हापासून पालिकेत निवडणूक या दोन गटात झाल्या 1996 मध्ये पुन्हा शिंदे गटाने सत्ता खेचली. विरोधकांचं स्थान केवळ उमेदवारी पुरतेच राहिले. 
बेरजेच्या राजकारणात सन 2001 ची पालिका निवडणूक मंत्री पाटील व शिंदे यांच्यात नुरा झाली. सन 2006 ची निवडणूक मनोमिलनाने बिनविरोध झाली. इथे मात्र शिवसेनेने एका जागेवर दावेदारी घेतली अनं विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या. या आशेने सन 2011 च्या निवडणुकीत विरोधक ताकदीने उतरले दिवंगत नानासो महाडिक यांनी पॅनेल उभे केले. 

दिवंगत मंत्री पतंगराव कदम यांनी सभा घेतल्या. पण हाती काही लागले नाही. या निवडणुकीत विरोधकांच्या मतांची टक्केवारी वाढली. त्यांचा आत्मविश्वास दुणावला. पालिका कारभारावर विरोधकांचा अंकुश दिसू लागला. त्यातून सन 2016 च्या निवडणुकीसाठी शिंदे पाटील गटा विरुद्ध सर्वपक्षीय लोकशाही आघाडीची निर्मिती झाली. वीस वर्षाच्या सत्तेच्या असंतोषाचा फायदा घेण्याचे विरोधकांचे स्वप्न सत्यात उतरले. जबरदस्त प्रचार यंत्रणा राबवली, कधी नव्हे एवढा खल उठला. सत्ताधाऱ्यांची भंबेरी उडाली दिवंगत विलासरावांना रात्रंदिवस प्रचार यंत्रणा राबवावी लागली,

तरीही तीन विरोधक तीन अपक्ष अशा सहा जणांनी पालिकेच्या इतिहासात विरोधक म्हणून इंट्री केली जाणकार विलासरावांनी लागलीच दोन अपक्षांना आपलेसे करीत सत्तेचे समीकरण साधले. चार विरोधकांनी दोन वर्षे सत्ताधाऱ्या पुढे आव्हाने उभी केली. पालिका कारभारावर वचक ठेवला, पण मध्यावर विरोधातील एकाला ठेकेदारीचे डोहाळे आले. नातलगांच्या नावे ठेकेदारी चर्चेत आली नव्हे, तर त्याने सत्ताधाऱ्यांची री..ओढली. इथेच विरोधकांची मुरसी झाली. विरोधकांच्या लोकशाही आघाडीत बिघाडी झाली

एकाच प्रभागातून विजयी झालेल्या दोन विरोधकांत ठेकेदारी टक्केवारी वरून अंगावर जाण्यापर्यंत प्रकार घडले. नागरिकांनी टाकलेला विश्वास विरोधकांनी ठेकेदारी गमावल्याच्या चर्चा झडल्या. विरोधी गटनेत्यांनी काहीसा विरुद्ध जिवंत ठेवला, पण गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर असाच काहीसा, पालिका निवडणूक अवघ्या आठ महिन्यांत आले असताना विरोधकातील बेकी सत्ताधाऱ्यांना सुखावणारी ठरत आहे. विरोधक असे असले तरी जनता मात्र तिसऱ्या पर्यायाच्या शोधात दिसत आहे. 

विरोधक निवडणुकीपुरतेच... 

तालुका पातळीवरील विरोधक केवळ पालिका निवडणुकीपूरतेच प्रकटताना दिसतात,शहरात इस्लामपूरचे,राहुल महाडीक, वाळव्याचे गौरव नायकवडी, खा राजू शेट्टी,यांचे गट आहेत.नेतृत्वाच्या जनसंपर्काअभावी हे गट सुप्त अवस्थेत आहेत यामध्ये आता निशिकांत पाटील गटाची भर पडली आहे,निशिकांत पाटील यांचा शहरात राबता आहे.विरोधकांचे या नेतृत्वानच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

संपादन : युवराज यादव