हेल्थ केअरमधील ‘मनोरमा’

- संदीप खांडेकर
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

अश्‍विनी दानिगोंड जागतिक दर्जाच्या यशस्वी सॉफ्टवेअर निर्माणकर्त्या उद्योजिका बनल्या आहेत. त्या मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या कार्यकारी संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. अभिनव कल्पना व त्याला तांत्रिकतेची जोड देऊन त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांची कंपनी कॉर्पोरेट, खासगी, वैद्यकीय क्षेत्रात सॉफ्टवेअर पुरविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी बनली आहे. आयटी हेल्थ केअरमध्ये त्या प्रवर्तक ठरल्या आहेत.

दानिगोंड मूळच्या सांगलीच्या. विवाहानंतर कोल्हापूरकर झाल्या. प्रभावी नेतृत्व, नेटवर्किंग व मजबूत विपणन धोरणासमवेत नव्या तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करून त्यांनी कंपनीच्या व्यवसायात वाढ केली.

कोल्हापुरात २००२ ला स्थापन झालेली त्यांची कंपनी एचआयएमएस सोल्युशन्स वुईथ इएमआर अँड इएचआर, इंटरप्राईज सोल्युशन्स (चेन ऑफ दि हॉस्पिटलसाठी), टेलिमेडिसिन, नेक्‍स्ट जनरेशन मोबाइल ॲप, आयओटी कनेक्‍टेड डिव्हाईसेस, आयओटी सोल्युशन्स आरोग्य गुणवत्तेसह पेशंट पोर्टल्ससाठी सेवा पुरविते. कंपनीने आशिया, मध्य पूर्व, आफ्रिकेत हेल्थ केअर सॉफ्टवेअर्स दिली आहेत. देशातील तीनशे हॉस्पिटल कंपनीचे ग्राहक असून इआरपी सोल्युशन्स वापरतात. इंटरनॅशनल मार्केटमध्ये तीसहून अधिक त्यांचे ग्राहक आहेत. मोठमोठ्या प्रोजेक्‍टमध्ये सॉफ्टवेअर प्रदान करून त्यांनी आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.

कंपनीने विविध देशांत प्रकल्प यशस्वी करून गुणवत्ता असेल, तर त्याला कोणत्याही देशाची सीमा रोखू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ (कुवेत), गव्हर्न्मेंट प्रोजेक्‍ट टेलिमेडिसिन आफ्रिका (टेलिमेडिसिन व टेली हेल्थ सर्व्हिेसेस), पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्‍ट केनिया, ब्लीस एंटरप्राईज सोल्युशन वुईथ एसटीजी इएमआर, ई क्‍लेम्स अँड केपीओ (२०० क्‍लिनिक्‍स, १२०० एसएलए वुईथ एसटीजी इएमआर, सीआरएम, ई क्‍लेम केपीओ फॅसिलिटी फॉर कॅशलेस बिलिंग), गव्हर्न्मेंट ऑफ इंडि पब्लिक हॉस्पिटल्स एंटरप्राईज, ऑनलाईन कन्सल्टन्सी ॲप्लिकेशन (यूएसए, लॅब इन बॅंक फॉर रिमोट डायग्नोसिस) हे प्रोजेक्‍ट यशस्वी करत कंपनीने आपला दर्जा सिद्ध केला आहे. 

कंपनीचे मुख्य कार्यालय कोल्हापुरात आहे. दिल्ली, मुंबई, बंगळूर व पुणे येथेही कार्यालये आहेत. कंपनीचे आंतरराष्ट्रीय कार्यालय दुबईमध्ये असून, सुमारे दीडशे कर्मचारी कार्यरत आहेत. इंडिवुड वैद्यकीय एक्‍सल्स (२०१६), चॅनेल वर्ल्ड १०० ट्रान्सफॉर्मर (२०१६), स्कोच अचिव्ह (२०१५), चॅनेल वर्ल्ड प्रायमर १०० (२०१५), आयडब्ल्यूएलएफ इनोव्हेशन (२०१४), जागतिक वैद्य परिषद, एमसीसीआय नवीन उपक्रम व उद्योजकता (२०१३), एक्‍सलन्स (सामाजिक सहयोगी-२०१३), मॅक्‍सवेल (२०१३), इनोव्हेटिव्ह टेक्‍नॉलॉजी ऑफ दि इयर (२०१३) आदी पुरस्कारांनी कंपनीचा गौरव झाला आहे.

Web Title: ashwini danigond success in health care business