कुष्टे कुटुंबियांकडून कर्मकांडाला फाटा देत विविध संस्थांना मदत... नातीने केले प्रबोधन 

अजित कुलकर्णी
Friday, 28 August 2020

सांगली- वयाची शंभरी ओलांडलेल्या इतिहासप्रसिद्ध जेलोफोडोत सहभागी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचे नुकतेच निधन झाले. स्वातंत्र्य लढ्यात निधड्या छातीने लढणारे कुष्टे कर्मकांड, अंधश्रध्देविरोधातही तडफेने लढले. मृत्यूनंतर काय करायचे, काय नाही याचे नियोजनही त्यांनी केले होते. रक्षाविसर्जन, पिंडदान, उत्तरकार्यसह कर्मकांडाला फाटा देत गरजूंना मदत केली. त्यांचा कोरोना अहवाल मृत्यूपश्‍चात निगेटिव्ह आल्याने महामारीच्या तावडीतूनही ते सुटल्याची भावना कुटुंबियांनी व्यक्त केली. 

अण्णा व्रतस्थ जीवन जगले. नेहमी त्यांच्यासोबत असणारी नात दुर्गाकडे त्यांनी समाजकारणाचा वारसा सुपूर्द केला आहे. त्यांनी तिला विज्ञानवादी व व्यापक दृष्टिकोनाची शिकवण दिलीय. मृत्यूनंतरच्या सर्व विधीला फाटा देण्यात आला. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. मात्र कोरोना संसर्गाच्या संशयाने तो अपुराच राहिला. घरी छायाचित्र नको, पुष्पहार अर्पण करू नका, कर्मकांडाऐवजी गरजू, अनाथांना, समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांना मदत करा, असी त्यांची सूचना होती. त्यानुसार मिरजेतील पाठक बालकाश्रमात चॉकलेट व गरजेच्या वस्तू देण्यात आल्या. वेलणकर अनाथालयाला वह्या-पुस्तके दिली. कुपवाडला वृध्दाश्रमात अन्नदान करण्यात आले. अण्णांच्या खादीचे व्रताची आठवण म्हणून हातरुमालही वाटले. राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रभक्तीपर प्रबोधन गीतांच्या कार्यक्रमाद्वारे श्रद्धांजली वाहिली. 

सदाशिव मगदूम, रामलिंग तोडकर, मोहनराव देशमुख, मिलिंद कांबळे, युवराज मगदूम, शिवानंद हिप्परगी, प्रसाद पवार, सुमय्या मुल्ला, शिवकुमार हेगाणा यांनी योगदान दिले. माजी आमदार प्रा. शरद पाटील, जहॉंगीर सय्यद यांच्यासह ज्येष्ठांनी कुष्टेंचा विचार तेवत ठेवणाऱ्या दुर्गाचे कौतुक केले. 

हार, टोपी आणि अण्णा... 
कुष्टे अण्णांनी देहदानाचा संकल्प केला होता. साथीदारांनाही त्यांनी या चळवळीत आणले. अनेक ठिकाणी सत्कार होत. हार न स्विकारण्याचा व इतरांनाही न देण्याचा कित्ता त्यांनी गिरवला. इंग्रजांपुढे हार न मानणारे आम्ही हार स्विकारत नाही, अशा विचारांची आठवण दुर्गाने सांगितली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistance to various organizations from kushte families