सहायक पोलिस निरीक्षक अमोलची ती पोस्ट खरी ठरली...

Assistant Inspector of Police from Shirala dies in Mumbai
Assistant Inspector of Police from Shirala dies in Mumbai
Updated on

शिराळा (जि. सांगली) : मूळचे शिराळा येथील व सध्या मुंबई येथे असलेले सहायक पोलिस निरीक्षक अमोल हणमंत कुलकर्णी यांचे शनिवारी पहाटे पाच वाजता राहत्या घरी निधन झाले. मृत्यूनंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

अमोल कुलकर्णी हे गेले काही दिवस ताप व सर्दी यामुळे आजारी असल्याने घरीच होते, तसेच सायन रुग्णालयात त्यांनी 13 मे रोजी कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिला होता. आज (ता. 16) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मात्र तत्पूर्वी पहाटे 5 च्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.

त्यांना सायन रुग्णालयान नेले, तेथे त्यांना मृत घोषित केले. त्यांचे आई, वडील, भाऊ, काका शिराळा येथे असून, वडील वीज वितरण कंपनीमध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहेत. शाहूनगर (मुंबई) येथे पत्नी व तीन वर्षांच्या मुलीबरोबर ते राहात होते. भांडुप पोलिस स्टेशन येथून प्रमोशनवर शाहूनगर पोलिस स्टेशनला ते डिटेक्‍शन ऑफिसर म्हणून कार्यरत होते.

भांडुप पोलिस ठाण्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही श्रद्धांजली वाहिली. धारावीत असलेले शाहूनगर पोलिस ठाण्याचा परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे, मात्र अशा परिस्थितीतही ते 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत होते. दरम्यान, श्री. कुलकर्णी यांचे मूळ गाव चिंचणी (ता. कडेगाव) हे आहे. त्यामुळे चिंचणीसह तालुक्‍यातील नागरिकांतून हळहळ व्यक्त होते. 

आम्ही आमचे आयुष्य देतोय... 
2 एप्रिल रोजी अमोल यांनी आपल्या फेसबुक वॉलवर "कोणी पाच कोटी देतोय, कोणी पाचशे कोटी दिलेत; पण आम्ही आमचे आयुष्य देतोय' अशी पोस्ट बंदोबस्तावरील पोलिसांच्या फोटोसह टाकली होती. आज ती गोष्ट त्यांच्या बाबतीत खरी ठरली. त्यांच्या या पोस्टची आज समाज माध्यमावर चर्चा होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com