सुभाष बळवाड हे अथणी हेस्कॉमला (Athani HESCOM) वायरमन म्हणून काम करतात. ते सत्ती सेक्शन ऑफिसला होते. ट्रान्स्फॉर्मरवर काम करत असताना त्यांनी वीज पुरवठा खंडित केला होता.
अथणी : नंदेश्वर (ता. अथणी) येथील सुभाष सदाशिव बळवाड (वय ३०) हा ट्रान्स्फॉर्मरवर काम करताना गुरुवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. वीज पुरवठा बंद करून काम करत असताना वीज पुरवठा (Power Supply) कोणी सुरू केला?, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.