

Members of Atpadi Nagar Panchayat amid intense political discussions
sakal
आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या ऐतिहासिक पहिल्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्या (ता. १५) होणाऱ्या उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लागले आहे. कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने निवड कमालीची रंगतदार झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस, तीर्थक्षेत्र विकास आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.