Mango Crop : आटपाडीत वादळाचा कहर! आंब्याच्या बागांत फळांचा खच, शेतकरी हवालदिल

Farmer Loss : आटपाडी तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला. सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने बहरलेल्या आंब्याच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त केल्या.
farmer loss

farmer loss

sakal

Updated on

आटपाडी : तालुक्यात आज सायंकाळी प्रचंड वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील पूर्व भागात आंब्याची मोठी पडझड झाली असून, जवळपास ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. अनेक बागांत जमिनीवर आंब्यांचा अक्षरश: खच पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com