आटपाडी : ‘विरोध महामार्गाला (Shaktipeeth Highway) नाही, तर आधी एकरी दीड कोटी रुपये भरपाई जाहीर करा, मगच मोजणीसाठी शेतात पाय ठेवा,’ अशी आक्रमक भूमिका घेतल्याने शेटफळेत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले पथक मोजणी न करता माघारी परतले. शेटफळेतील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला भरपाईवरून तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे.