आटपाडी तालुका पुन्हा राष्ट्रवादीमय करणार - अविनाश पाटील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

राष्ट्रवादीच्या कार्याची गती बघून महाराष्ट्रातील अनेक लोक पक्षात येण्यास इच्छुक आहेत. याचाच एक भाग म्हणून आज आटपाडी तालुक्‍यात काही प्रमुख कार्यकर्ते पदभार स्विकारत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून तालुका राष्ट्रवादीमय केला जाईल असे जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रतिपादन केले. 

आटपाडी (सांगली) : राष्ट्रवादीच्या कार्याची गती बघून महाराष्ट्रातील अनेक लोक पक्षात येण्यास इच्छुक आहेत. याचाच एक भाग म्हणून आज आटपाडी तालुक्‍यात काही प्रमुख कार्यकर्ते पदभार स्विकारत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून तालुका राष्ट्रवादीमय केला जाईल असे जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रतिपादन केले. 

आटपाडी तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, युवा नेते वैभव पाटील, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील उपस्थित होते . 

यावेळी आटपाडी तालुक्‍यातील माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पद व जबाबदारी पत्राचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . प्रास्ताविक व स्वागत हणमंतराव देशमुख यांनी केले. वैभव पाटील म्हणाले,' इथून पुढे मी कुणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून तालुक्‍यात घराघरात माझा कार्यकर्ता तयार करणार. त्याचीच सुरुवात म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात 140 लोकांना वेगळ्या सेलच्या माध्यमातून निवड केली.' माजी आमदार श्री. पाटील म्हणाले ,'मी आमदार असताना दहा वर्षांच्या कारकिर्दीत तालुक्‍यातील एकाही व्यक्तीला कधीच आडवले नाही तर त्याचे काम पूर्ण करण्याची भूमिका ठेवली.' 

याप्रसंगी उमेश पाटील, नारायण खरजे,सचिन राजमाने, प्रभाकर पाटील यांची जिल्हास्तरावर निवड केली तसेच अनेक युवा कार्यकर्त्यांचे तालुकास्तरीय निवड केली. यावेळी राष्ट्रवादीचे सादिक खाटीक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष करण पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष निलेश पवार, महिला तालुका अध्यक्ष अश्विनी कासार, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष जालिंदर कटरे, युवक तालुका सेलचे अध्यक्ष सुरज पाटील उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atpadi taluka will be nationalized again