आटपाडी : आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चक्क वादळ आले असून, अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या निवडणुका जाहीर होताच तालुक्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. .या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. केंद्र व राज्यात एकत्र असले तरी तालुकास्तरावर मात्र दोन्ही पक्षांतील वैर उघडपणे दिसून येत आहे..Jayant Patil Sangli : जयंत पाटलांना मोठा धक्का! आमदार अरूण लाड यांचे चिरंजीव भाजपमध्ये, चंद्रकांत दादांचे मिशन ZP, पदवीधर.आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर पूर्वीचा आटपाडी जिल्हा परिषद गट रद्द होऊन नवा निंबवडे गट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेचे चार गट कायम आहेत. यामध्ये करगणी व खरसुंडी हे सर्वसाधारण (खुले) गट असून, दिघंची हा सर्वसाधारण ओबीसी तर निंबवडे हा ओबीसी महिला राखीव गट आहे. .भाजप व शिवसेनेकडून काही गटांतील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली असून, काही गटांतील नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. पंचायत समितीचे करगणी, शेटफळे, नेलकरंजी, खरसुंडी, झरे, निंबवडे, दिघंची आणि विठलापूर असे आठ गण आहेत. .Atpadi Nagaradhyaksh Result: आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्का.पंचायत समितीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी भाजप व शिवसेनेने कंबर कसली असून, गेल्या काही दिवसांपासून मोर्चेबांधणी व तयारी जोरात सुरू आहे. विशेषतः निंबवडे गटात यावेळी ‘हाय-व्होल्टेज’ लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत..जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने निंबवडे गटाच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या गटात भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू व समाजकल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर, तर आयकर उपायुक्त सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे यांच्यात तुल्यबळ लढत अटळ मानली जात आहे. या लढतीचा निकाल जिल्हा परिषद सत्तेसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे..निवडणुकीत भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख आणि ब्रह्मानंद पडळकर यांचे नेतृत्व राहणार असून, शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर व तानाजीराव पाटील यांच्याकडे सूत्रे असणार आहेत. .करगणी गट सर्वसाधारण खुला असल्याने येथून तानाजीराव पाटील स्वतः मैदानात उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खरसुंडी गटात मात्र शिवसेना काँग्रेसच्या मदतीने भाजपला रोखण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसते..याशिवाय खरसुंडी, करगणी व दिघंची गटात राष्ट्रीय समाज पक्षाने तयारी सुरू केली असून, खरसुंडी गटात काँग्रेस व मनसेही सक्रिय झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांची भूमिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गावोगावी बैठका, मेळावे सुरू केले आहेत. .पुणे व मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त असलेल्या मतदारांच्या गाठीभेटी, तसेच महिलांसाठी मोफत तीर्थक्षेत्र दर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही पक्षांतर होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात असून, आटपाडीतील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.