टेंभू योजनेतून आटपाडीचा रेबाई तलाव हाऊसफुल्ल 

नागेश गायकवाड
Saturday, 12 September 2020

पुराच्या पाण्याने टेंभू योजनेतून शेटफळे येथील रेबाई तलाव आणि ओढ्यावरील बंधारे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागणीची दखल घेऊन भरल्याबद्दल युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या पाण्याचे पूजन केले. हा तलाव हाऊसपुल्ल भरला आहे. 

आटपाडी : पुराच्या पाण्याने टेंभू योजनेतून शेटफळे येथील रेबाई तलाव आणि ओढ्यावरील बंधारे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागणीची दखल घेऊन भरल्याबद्दल युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या पाण्याचे पूजन केले. हा तलाव हाऊसपुल्ल भरला आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून पुराचे वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळी भागातील मुख्य तलाव आणि ओढ्यावरील बंधारे भरून दिले जावेत, अशी मागणी केली जात होती. यासाठी आंदोलनेही झाली होती. यावर्षी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दुष्काळग्रस्तांच्या मागणीची दखल घेऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याअगोदरच टेंभू योजना सुरू करून दुष्काळी भागातील तलाव भरण्यासाठी पाणी चालू केले होते. हे पाणी मोफत सोडले आहे. 

आटपाडी तालुक्‍यातील आटपाडी तलावासह अनेक तलावात पाणी पोहोचले आहे. शेटफळे येथील रेबाई तलाव आणि करगणी, माळेवाडी आणि शेटफळे ओढ्यावरील बंधारे पुराच्या पाण्याने भरून दिले जावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील आणि शेटफळेचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी केली होती. यासंबंधी पाटबंधारे विभागाला निवेदन देऊ पाठपुरवठा केला होता. 

पाण्याने करगणी, माळेवाडी आणि शेटफळे ओढ्यावरील बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मागणीची दखल घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी पाण्याचे पूजन केले. राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, शेटफळचे अध्यक्ष किशोर गायकवाड, प्रा. संभाजी पाटील, माजी उपसरपंच प्रकाश गायकवाड, महेश जवळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atpadi's Rebai Lake is housefull from the Tembhu scheme