इस्लामपूर : पेट्रोल पंपाजवळच्या गेटमधून आत जाण्याच्या किरकोळ कारणावरून राजारामबापू साखर कारखान्याच्या (Rajarambapu Sugar Factory) वॉचमनवर चाकूने खुनी हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. २) राजारामनगर परिसरात घडली. सुयोग मोहिते व सलमान संदे (दोघे साखराळे) या दोघांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात (Islampur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.