esakal | पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलींची चोरी करणार अट्टल चोरटा जेरबंद | Paschim maharashtra
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलींची चोरी करणार अट्टल चोरटा जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला मंगळवार (ता. १२) माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीच्या ११ मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गेल्या काही दिवसापासून शहर व उपनगरात मोटारसायकलींची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे माळमारुती पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची पोलिस ठाण्यात कसून चौकशी केली असता त्याने शहर परिसरातून ११ मोटरसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानुसार त्याच्याकडून सात लाख रुपये किमतीच्या चोरीच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी यांच्या नेतृत्वाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक व्हनाप्पा तलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटल चोरट्याला अटक करून ११ दुचाकी जप्त करण्यात यश आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माळमारुती पोलिसांचर कौतुक करण्यासह त्यांना बहुमान घोषित केला आहे.

loading image
go to top