Krishna River Crocodile Sighting
esakal
अंकलखोप (जि. सांगली) : औदुंबर येथील कृष्णा नदीच्या डोहात सध्या आठ ते दहा फूट लांबीच्या मगरीचा वावर पाहायला मिळत आहे. येथील नावाडी नितीन गुरव यांच्या म्हणण्यानुसार, दररोज सकाळी ही मगर घाटाच्या काठावर येऊन उन्हात बसते. औदुंबर येथे येणाऱ्या भाविकांनाही घाटावरून मगरीचे दर्शन होत (Krishna River Crocodile Sighting) आहे.