वीज दरवाढ मागे न घेतल्यास महावितरणच्या कार्यालयांना टाळे 

Avoid MSEDCL offices if power tariff hike is not withdrawn
Avoid MSEDCL offices if power tariff hike is not withdrawn

सांगली : पंधरा दिवसात दरवाढ मागे न घेतल्यास जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकू, असा असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आज दिला. वीज दरवाढ तात्काळ रद्द करा, वीज बिलात सवलत द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विश्रामबाग येथील वीज वितरण कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली. 

"वीज दरवाढ रद्द करा, बिलात सवलत द्या, या सरकारचे करायचे काय..., स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो,' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. निवेदनातील आशय असा, कोरोना, अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्याचे कंबरडे मोडले आहे. 

शेतीसह सर्व व्यवसाय धोक्‍यात आले आहेत. अशा परिस्थितीत सर्वाचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यातच तेरा ते सोळा टक्के वीज दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. अव्वाच्या सव्वा वीज बिले आली आहेत. ती भरणे शक्‍य नाही. वीज दरवाढ मागे घ्या अन्यथा सर्व कार्यालयांना टाळे ठोकले जाईल. खराडे म्हणाले,""राज्य सरकारने आर्थिक सबब सांगू नये. प्रसंगी कर्जेकाढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.'' 

यावेळी शेकापचे जिल्हा सरचिटणीस शरद पाटील, पोपट मोरे, भागवत जाधव, संजय बेले, राजेंद्र माने, प्रभाकर पाटील, जोतिराम जाधव, महेश जगताप, बाळासाहेब जाधव, सुरेश पाचिबरे, निखिल कारंडे, मारुती देवकर, वसंत सुतार, विनायक पवार उपस्थित होते. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com