सांगली- राज्य शासनाने वाढीव वीज बिले माफ करण्याचे खोटे आश्वासन देत आता थेट कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा देऊन जनतेची फसवणूक केली आहे. महाविकास आघाडी सरकार खोटारडे आहे. नोटिसा मागे घाव्यात अन्यथा वीज वितरण कंपनीचे कामकाज रोखण्यात येईल असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी दिला.

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज हिराबाग कॉर्नर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा मागे घेण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या महिलांनी जोरदार निदर्शने केली. महाविकास आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.
ऍड. स्वाती शिंदे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार खोटारडे आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वाढीव विज बिले माफ करण्याचे खोटे आश्वासन जनतेला दिले होते. आता 75 लाख ग्राहकांना विज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा देवुन महाराष्ट्र अंधारात टाकण्याचे पाप महाविकासआघाडी सरकारने केले आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडल्याने लोकांकडे पैसे नाहीत आणि राज्यातील सरकार तिप्पट वीज बिल वसुली करुन सर्वसामान्य लोकांचे खिसे रिकामे करतेय. जर सरकारने विज कनेक्शन तोडण्यासाठी दिलेल्या नोटीसा मागे घेवून जनतेला दिलासा दिला नाही तर आम्ही वीज वितरण कंपनी कार्यालयाचे कामकाज होवू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी ज्योती कांबळे, छाया हाक्के, स्मिता पवार, गंगा तिडके, वैशाली पाटील, सोनाली सागरे, मंगल मोरे, माधुरी वसगडेकर, सुनिता इनामदार, सुस्मिता कुलकर्णी, शैलजा पंडित, गौरी माईनकर, हिना शेख, मनीषा शिंदे, संगीता चव्हाण, वैशाली पडळकर, मनीषा चव्हाण, ललिता कांबळे, मीरा मेस्त्री, निकिता चव्हाण, पूजा सुतार, आशा पवार, वंदना जाधव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.