चरण तलाठ्याची बदली न केल्यास तलाठी कार्यालयाला टाळे  

Avoid Talathi office if Charan Talathi is not replaced
Avoid Talathi office if Charan Talathi is not replaced
Updated on

शिराळा : चरण (ता. शिराळा) येथील तलाठी अमित जंगम यांची चौकशी करून बदली करावी अन्यथा तलाठी कार्यालयाला 30 ऑक्‍टोबर रोजी टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा शिराळा पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब नायकवडी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला. प्रांताधिकारी नागेश पाटील व तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे, की चरण येथील तलाठी अमित जंगम दोन वर्षापासून कार्यरत आहेत. कामकाजाबाबत चरण, मोहरे, नाठवडे, शेडगेवाडी येथील नागरिकांनी वरिष्ठाकडे तक्रारी करूनही त्यांच्या कामकाजपद्धतीत बदल झाला नाही. ते कामाच्या ठिकाणी महिन्यातील चार दिवस सुद्धा हजर नसतात. 

लोकांशी उद्धट बोलणे, फोन न उचलणे, दोन-दोन महिने हेलपाटे मारूनही पीक कर्जासाठी लागणारे सातबारा उतारा न देणे, शिराळा येथे लोकांना 40 किलोमीटर अंतरावरून नाहक हेलपाटे मारायला लावणे, वारसा नोंदी, नवीन खरेदी दस्तांच्या नोंदी यासाठी लोकांकडून पैशाची मागणी करणे, पीक कर्जासाठी लागणारे सातबारा उतारे वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही. 

यापूर्वीही त्यांच्याबद्दल मांगले ग्रामस्थांनी रात्री दहा वाजेपर्यंत कार्यालयात कोंडून ठेवले होते. त्यांची चौकशी करून तातडीने 29 ऑक्‍टोबरपूर्वी अन्यत्र बदली करावी अन्यथा 30 ऑक्‍टोबररोजी गाव बंद करून तलाठी कार्यालयास टाळे ठोकले जातील. विश्वास कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र नायकवडी, यासीन नायकवडी, राम कारभारी, रामचंद्र पाटील, महादेव पाटील, विश्वास महिंद उपस्थित होते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Koyna Dam water level July 2026
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com