"कोरोना' लढाईत बालशाहिरही करतोय जागृती

 Awareness of Bal shahir in the battle of "Corona"
Awareness of Bal shahir in the battle of "Corona"
Updated on

आलं कोरोना संकट 
उठ मर्दा उठ 
आपण मावळे शिवबाचे 
संकटाला नाही घाबरायचे 
घरी थांबून युद्ध जिंकायचे।। जी... 
कोरोना व्हायरस आला आला 
दुर्लक्षीत करु नका त्याला 
मीच माझा रक्षक भला 
समजून घेवून चला 
घरी थांबून युद्ध जिकायचंच || जी.. 

दादाहो...दादा...अशी आर्त हाक समाजाला देतोय बालशाहिर अमोघराज आंबी. "कोरोना' ससंर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. प्रशासन महिन्याभरापासून खडा पहारा देत आहे. सोशल मीडियाद्वारे घरा बाहेर पडू नका असा संदेश दिला जात आहे. "कोरोना' च्या लढाईत बालशाहिर अमोघराज आंबी यानेही उडी घेतलीय. त्याचा पोवाडा सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. हजारो लाईक मिळत आहेत. 

अमोघराज आंबी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाहिर बजरंग आंबी याचा नातू. आंबी कुटुंबाला शाहिरीचा वसा व वारसा आहे. अमोघराज तिसऱ्या पिढींचे प्रतिनिधित्व करतोय. 

वय वर्ष अवघे सात वर्षे. सांगलीच्या आप्पासाहेब बिरनाळे इंग्लिश मिडीयम्‌ स्कूलमध्ये पहिलीत शिकतोय. आजोबा बजरंग आंबी यांनी "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर प्रबोधनपर पोवाड्याची रचना तयार केली. अमोघराजने पोवाडा पाठ केला. कोवळ्या हातात डफ घेऊन गायीलेला पोवाडा सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. 

जिल्ह्याला शाहिरीची मोठी पंरपरा आहे. लोकशाहिर आण्णाभाऊ साठे, शंकरराव निकम, बाळकृष्ण कुलकर्णी बलवडीकर, शिराळकर, ग. द. दीक्षित, र. द. दीक्षित, बापूराव विभूते यांच्यासह नव्या पिढीतील देवानंद माळी, प्रसाद विभूते यांच्यासह शाहिरांनी परंपरा पुढे नेली आहे. समृद्ध केली आहे. 
"कोरोना' च्या ल्‌ढाईत अनेक लोक, कलाकार, समाजसेवक योगदान देत आहेत. त्यात अमोघराजने पोवाड्यातून केलेल्या प्रबोधनाला वेगळेच महत्त्व आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com