बल्लोळी कुटुंबीय रडत आणि भयभीत अवस्थेत पुन्हा जयसिंगपूर बसस्थानकात आले. यावेळी वाहतूक नियंत्रकांनी त्यांना पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर सर्वांनाच सुखद धक्का बसला.
जयसिंगपूर : तीन वर्षांची बालिका जयसिंगपूर बसस्थानकावर कुटुंबीयांपासून दुरावली. तिचे कुटुंबीय मिरज बसस्थानकावर गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान, बसस्थानकावरील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या (College Student) जागरूकतेमुळे बालिका सुखरूप जयसिंगपूर पोलिसांत (Jaysingpur Police) पोहोचली. कर्नाटक पोलिसांत (Karnataka Police) असणारे तिचे वडील आणि कुटुंबीयांनी मुलीचा बसस्थानकावर शोध घेऊन पोलिस ठाण्यात आल्यानंतर मुलीला पाहून सुटकेचा निःश्वास टाकला.