
पाथर्डी - राज्य सरकारने निवडणुकीपुर्वी केलेल्या सरसकट कर्जमाफीचे धोरण अवलंबीले असते तर मल्हारी बटुळे यांचा बळी गेला नसता. बटुळे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयाची रोख मदत भारतीय जनता पक्षाने केली आहे. मल्हारी बटुळे यांच्या पत्नीला नोकरीत समावुन घेण्यासाठी राधाकृष्ण विखे यांच्याशी चर्चा झाली आहे. बटुळे यांच्या मुलांनी व आई-वडीलांनी खचुन जाऊ नये आम्ही तुमच्या सोबत आहोत. अधिवेशनात याबाबत शेतकरी आत्महत्येबाबत सरकारला जाब विचारु असे असा इशारा विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.
भारजवाडी येथे मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबाची दरेकर यांनी रविवारी भेट घेतली. आमदार मोनिका राजळे, प्रांतअधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार नामदेव पाटील, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, गोकुळ दौंड, रविद्र वायकर, सोमनाथ खेडकर, पांडुरंग खेडकर, काकासाहेब शिंदे उपस्थीत होते.
शिकून मोठा हो.. आम्ही पाठीशी आहोत
यावेळी दरेकर यांनी बटुळे यांची तीन मुलांशी सवांद साधला. प्रशांतशी बोलताना दरेकर म्हणाले, तुला शेतक-याची कविता कशी सुचली. तुझ्या वेदना आणि संवेदनेला माझा सलाम. आता धीर धरावा लागेल, अभ्यास करुन मोठा हो. तुमच्या शिक्षणासाठीचा खर्च आम्ही करतो. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले, ह्रदय हेलावणारी ही घटना आहे. बटुळे कुटुंबासोबत आम्ही अहोत. शेतक-यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. उद्याच्या अधिवेशनात याबाबत सरकारला जाब विचारु.
जागा द्या एक कोटी रूपये देतो
उसतोडणी कामगारांच्या मुलासाठी निवासी वस्तीगृह बांधण्यासाठी सरकारी जागा उपलब्ध करुन द्या मी चार विधानपरीषदेच्या आमदारांचा मिळुन एक कोटी रुपयाचा निधी देतो. मुंबई मधील काही स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने चांगले वस्तीगृह उभारु. सरकारच्या मदतीवर असलंबुन राहीलो तर काहीच होणार नाही. आमदार मोनिका राजळे यांनी याबाबत पाठपुरावा करावा आम्ही मदतीसाठी तयार अहोत. खाजगी बँकेचे अधिकारी वसुलीसाठी आले तर त्यांना धरुन चोपा आणि माझे नाव सांगा असा सल्ला दरेकर यांनी बटुळे कुटुंबाला दिला आहे.
बाबासाहेब बटुळे म्हणाले, सेंट्रल बँकेचे अकरा लाख रुपयाचे कर्ज टँक्टरसाठीचे घेतलेले आहे. खाजगी बँकेचे ट्रकसाठीचे कर्ज घेतले आहे. ट्रक चोरीला गेली. कर्ता मुलगा गेल्याने आता आम्ही उघड्यावर पडलो अहोत. मुलांच्या पाठीमागे आधाराची गरज आहे.बँकेच्या तगाद्यामुळे मुलाने आत्महत्या केली.
यावेळी प्राथमिक शाळेचे शिक्षक लहु बोराटे यांनी बटुळे यांची मुले शेतक-यांनी आत्महत्या करु नये म्हणुन जागृती करीत असताना ही घटना घडली याच वाईट वाटते . चांगल्या मुलांच्या डोक्यावरच छत्र हरपल्याचे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले.
दरेकर यांनी बटुळे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांचा आशिर्वाद घेतला. गडाचे विश्वस्त अँड. जगन्नाथ बटुळे यांनी नामदेवशास्त्री यांनी लिहलेले पुस्तक दरेकर व मोनिका राजळे यांना भेट धेवुन त्यांचा गौरव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.