आयुर्वेद दवाखाने रोज दोन तास सुरु राहतील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

..........
आयुर्वेद दवाखाने रोज
दोन तास सुरु राहतील

वैद्य अमोल पाटील ः रुग्णांनी अपॉईंटेमेंटस्‌ घ्याव्यात

सांगली : कोरोना साथीमुळे सध्याच्या संचारबंदी काळात शहरातील सर्व आयुर्वेदिक दवाखाने संध्याकाळी पाच ते सात या वेळेत सुरु राहतील. रुग्णांनी फोनवरून अपॉंईटमेंट घ्याव्यात. असे आवाहन आयुर्वेद पंचकर्म प्रॅक्‍टीशनर्स असोशिएशनच्यावतीने करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष वैद्य अमोल पाटील यांनी याबाबत सकाळला कळवले आहे.

 

वैद्य पाटील म्हणाले,"" आपण समाजाला सेवा दिली पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे. सर्वांनी पाच ते सात या वेळेत बाह्यरुग्ण विभाग सुरु करावेत. पुरेशी काळजी घ्यावी. प्रत्येक रुग्ण तपासल्यानंतर सॅनिटायझर्सचा वापर करावा. मास्क घाला. प्रत्यक्ष रुग्ण तपासणी शक्‍य तेवढी टाळा. हे सारे रुग्णांना आणि आपल्या स्टाफलाही सांगा. आपल्या स्टाफला ओळखपत्रे द्या. ऍप्रन परिधान करूनच उपचार करा.''
डॉ.पाटील म्हणाले,"" आपआपल्या फॅमिली डॉक्‍टर्संना फोन करून तातडीच्यावेळी वैद्यकीय सेवा घ्या. डॉक्‍टरांनी सेवा द्यावी. रुग्णांनी एकाचवेळी गर्दी न करता काळजी घ्यावी.''
.....

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurvedic clinics will continue for two hours every day