
इस्लामपूर : सुप्रीम कोर्टामध्ये बैलगाडी शर्यतीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे राज्यात बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू झाल्या आहेत. बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून संपूर्ण महारष्ट्राला एक वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत अशा बैलगाडी शर्यतीस लागणारी सर्वतोपारी मदत करणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.