
-सुनील पाटील
निपाणी : हालाखीच्या परिस्थितीत सुरुवातीला पोलिसाची नोकरी लागली; पण शिक्षक होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. योगायोगाने शिक्षकाची नोकरी मिळविली. ७५ वर्षे शिक्षकीपेशाला वाहून घेतले. निपाणीत स्वातंत्र्यांनंतर झालेल्या शैक्षणिक प्रगतीचे ते साक्षीदार आहेत. वय ९३ वर्षे; पण अनेक आठवणींचा त्यांच्याकडे खजिना आहे. या वयातही ते रोज नियमित चालणे, योगाभ्यासामुळे ठणठणीत आहेत. मूळगाव कोगनोळी; पण कायम वास्तव्य निपाणी येथे. बाजीराव गोविंद पाटील असे उमद्या तरुणाचे हे नाव.