esakal | आता बाळासाहेबांचा पुत्रच मुख्यमंत्री असल्याने बेळगावचा प्रश्‍न सुटेल 
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut.jpg

बेळगाव येथील सार्वजिनक वाचनालयाच्या व्याख्यानमालेच्या उद्‌घाटनाप्रसंगी खासदार राऊत यांची मुलाखत झाली. यात राऊत म्हणाले, देशाच्या संसदेत बॅरेस्टर नाथ पै यांच्यासारखा संसदपटू दिसत नाही. पंडित नेहरूंनाही त्यांच्यामुळे घाम फुटायचा. नाथ पै ना ऐकायला सभागृहात नेहरू येत असत.

आता बाळासाहेबांचा पुत्रच मुख्यमंत्री असल्याने बेळगावचा प्रश्‍न सुटेल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सीमा प्रश्‍न अनेक दिवसांचा आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्रच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे हा प्रश्‍न सुटेल, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सीमा वाद प्रश्‍न सुटायला हवा, उगाच एममेकाची डोकी फुटायला नकोत, बाळासाहेबांनी दिलेली मराठी अस्मिता टिकायला हवी, असेही राऊत म्हणाले आहेत. 
बेळगाव येथील सार्वजिनक वाचनालयाच्या व्याख्यानमालेच्या उद्‌घाटनाप्रसंगी खासदार राऊत यांची मुलाखत झाली. यात राऊत म्हणाले, देशाच्या संसदेत बॅरेस्टर नाथ पै यांच्यासारखा संसदपटू दिसत नाही. पंडित नेहरूंनाही त्यांच्यामुळे घाम फुटायचा. नाथ पै ना ऐकायला सभागृहात नेहरू येत असत. बेळगावची संस्था त्यांचं स्मरण ठेवते हे महत्वाचे आहे. विचित्र परिस्थितीत मी इथे आलो आहे. पण मला कायद्याच्या चौकटीत राहून बोलावे लागेल. भाषावार प्रांत रचना झाली तरी भाषे भाषेत वाद असू नयेत. मोठ्या प्रमाणात कानडी बांधव राहातात. कन्नड शाळांना अनुदान देण्याचे कामही आम्ही करतो. कानडी माध्यमाच्या शाळा टीकाव्यात यासाठी आम्ही अनुदान देतो, मदत करतो. सोलापूर व लातूर जिल्ह्यात कन्नड शाळा आहेत. त्या टीकल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. कर्नाटकमधील कलावंत, साहित्यिक यांचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. गिरिश कर्नाड, भीमसेन जोशी, रजनीकांत हे कर्नाटकातीलच आहे. कॉंग्रसेचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचेही आम्ही स्वागत करतो ते मराठीत संवाद साधतात, असे राऊत म्हणाले. 
आमच्या मनात काही खोट नाही. वित्त भर जमिनीसाठी युद्ध नाही. दोन्ही बाजूने पांडव आहेत. हा वाद आधीच्या राज्यकर्त्यांनी मिटवायला हवा होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. पण आता बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री आहेत. प्रश्‍न सुटायला हवा उगाच एममेकाची डोकी फुटायला नकोत. बाळासाहेबांनी दिलेली मराठी अस्मिता टिकायला हवी, असे राऊत म्हणाले.