esakal | डोळ्यांसमोर द्राक्ष बाग झाली उद्वस्थ
sakal

बोलून बातमी शोधा

In balvadi grapes field hit due to corona

लवडी भा. (ता. खानापूर, जि. सांगली ) येथील द्राक्ष बागायतदार अनिल येसुगडे यांच्या पाच एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेला यांचा फटका बसला आहे. येसुगडे यांचे यात सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. 

डोळ्यांसमोर द्राक्ष बाग झाली उद्वस्थ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळसंद : "कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुण्यासह प्रमुख बाजार समित्या बंद आहेत. त्याची सर्वाधिक झळ द्राक्षबागांला बसत आहे. द्राक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बलवडी भा. (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदार अनिल येसुगडे यांच्या पाच एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेला यांचा फटका बसला आहे. येसुगडे यांचे यात सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. 

श्री. येसुगडे यांचे जुन्या पलूस रस्त्यावर पाच एकर क्षेत्रात द्राक्षबागेची लागवड केली आहे. सुपर सोनाटा, माणिक चमन, साधी सोनाका जातीच्या द्राक्षांची लागवड केली आहे. श्री. येसुगडे यांनी मोठ्या जिद्दीने पिकवलेली द्राक्ष कोरोनाच्या तडाक्‍याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागेत द्राक्षांच्या मण्यांचा सडा पडला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संचारबंदी लागू केली. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहिर केला. जीवनावश्‍यक वस्तूंचे वगळ्यात येतील, असे सांगितले. परंतु शेतमालासाठी उभारल्या मुंबई, पुण्यासह बाजार समिती गर्दीच्या कारणांमुळे बंद केल्या. परिणामी, व्यापाऱ्यांनी द्राक्षबागांकडे पाठ फिरवली. मध्यंतरी अतिवृष्टीत हजारो रुपये खर्चून द्राक्षबागा वाचवल्या. सध्या "कोरोना' च्या तडाख्याने द्राक्ष होत डोळ्यासमोर होत असलेले नुकसान पाहून हताशपणे बसण्यावाचून पर्याय राहिला नाही. 

डोळ्यासमोर होत असलेले नुकसान पाहवत नाही

कोरोना' च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्याचा फटका द्राक्षबागेला बसला. बाजार समिती बंद व्यापारी द्राक्ष खरेदी करण्यास फिरकत नाहीत. परिणामी, पाच एकर क्षेत्रातील द्राक्षे बागेत पडून आहेत. डोळ्यासमोर होत असलेले नुकसान पाहवत नाही. त्यामुळे द्राक्षबागेकडे जाणं सोडून दिले आहे.

- अनिल येसुगडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी (बलवडी (भा.) 
 

loading image