चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीवर बंदी...पर्यावरण पूरक गणेशउत्सव साजरा करा : आयुक्त नितीन कापडणीस

बलराज पवार
Tuesday, 11 August 2020

सांगली-  कोरोना बरोबर आगामी गणेशोत्सवाच्या तयारीला मनपा प्रशासन लागले आहे. यंदाच्या गणेशोत्सव चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीवर बंदी घालण्यात आली असून चार फुटापेक्षा अधिक गणेश मूर्ती असणाऱ्या मंडळांना परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी बैठकीत केले आहे.

आगामी गणेशोत्सवासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज आपल्या दालनात बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सर्व सहायक आयुक्त आणि मनपाचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी जनतेमध्ये प्रबोधन करने, घरगुती गणेश मूर्त्यांचे नदी पात्राऐवजी विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करणे, छोट्या व मोठ्या मुर्त्या या दान स्वरूपात स्वीकारणे याचबरोबर सोशल डिस्टन्स आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करूनच गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर चार फुटापेक्षा अधिक उंचीची गणेशमूर्ती असणाऱ्या गणेश मंडळांना परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच गणेश मंडळानी आपली गणेश मूर्ती 4 फुटापेक्षा अधिक उंच घेऊन नये असे आवाहनही यावेळी बैठकीत करण्यात आले. याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनानुसारच गणेश मंडळांना परवानगी दिली जाणार असल्याचेही आयुक्त नितीन कापडणीस यांनी या बैठकीत बोलताना सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on Ganesh idols over four feet . Celebrate environmentally friendly Ganesh Utsav: Commissioner Nitin Kapdanis