
-संतोष कणसे
कडेगाव : तालुक्यात शेतकरी वर्ग आता पारंपरिक ऊस पिकाला पर्याय म्हणून नवनवीन पिकांचे प्रयोग करताना दिसत आहे. वांगी येथील प्रगतशील शेतकरी चंद्रोदय सूर्यवंशी यांनी आपल्या शेतात केळी पिकाचा अभिनव प्रयोग करून यश संपादन केले आहे. सूर्यवंशी यांनी ७० गुंठ्यांत केळीचे ४५ टनाचे विक्रमी उत्पादन घेत यांतून ९ लाख रुपये मिळविले आहे.