हिम्मत जाधव यांची साडेचार एकर जी - ९ केळीची बाग आहे. त्यांनी पाच फूट रुंद व सात फूट लांबी अंतरावर केळीची लागवड केली आहे.
आळसंद : जागतिकीकरणामुळे पारंपरिक शेतीने कात टाकून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेती करत आहेत. शेतकऱ्यांनी (Farmers) उत्पादित केलेला शेतमाल जगाच्या बाजारपेठेत दाखल करत आहेत. त्याचा प्रत्यय आळसंद (ता. खानापूर) येथील प्रयोगशील शेतकरी हिम्मत बाजीराव जाधव यांनी उत्पादित केळी अरब राष्ट्रांमध्ये (Arab Nation) निर्यात केली जात आहेत. केळीस प्रतिटनाला तब्बल १९ हजार रुपये भाव मिळत आहे.